◻ शेडगाव येथे राबवण्यात आला उपक्रम ; इंदुरीकर महाराजाकडून कौतुक.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल दिवगंत भागोजी गणफत सांगळे याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्याची मुले असलेल्या प्रकाश सांगळे, प्रभाकर सांगळे व दत्तात्रय सांगळे यानी इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शेडगाव तसेच ओझर बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्याना वह्या वाटप करुन आपल्या वडीलाच्या आठवणी जपल्या असून त्याच्या या उपक्रमाचे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर तसेच ग्रामस्थानी कौतुक केले आहे.
२१ ऑगस्टं रोजी दिवगंत भागोजी गणफत सांगळे याचा प्रथम पुण्यस्मरण दिन होता. सध्या कोविड - १९ चे संकट असल्याने पुण्यस्मरणानिमित्त होणार अनावश्यक खर्च टाळून तो सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय सांगळे कुटुंबाने घेतला. त्यानुसार शेडगाव तसेच शेडगाव फाटा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेडगाव फाटा येथिल सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात विद्यालय व ओझर बुद्रुक येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर याच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय तसेच ज्ञानेश्वर माऊली निराधार बालगृह येथिल विद्यार्थीना समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर याच्या हस्तें वह्या वाटप केले आहे.
दरम्यान सांगळे कुटुंबाने सुरु केलेल्या सुदंर उपक्रमाचे इंदुरीकर महाराज यांनी कौतुक करुन परिसरातील नागरीकानीही हा उपक्रम आचरणात आणावा असे आवाहन त्यानी यावेळी केले आहे. याप्रसंगी प्रकाश सांगळे, प्रभाकर सांगळे, दत्तात्रय सांगळे व सांगळे कुटुबिय तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.