◻ सरपंच पदासाठी ६ उमेदवाराचे अर्ज
◻माघारीच्या दिवसाकडे लागले मतदारांचे लक्ष
संगमनेर LlVE | शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील अतिशय प्रतिषठेच्या अशा आश्वी बुद्रुंक ग्रामपंचायत पंचवार्षीक निवडणूकीसाठी महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने - सामने उभे ठाकणार असल्याने अटीतटीची दुरंगी लढत होणार आहे.
सरपंच पद अनुसुचित जमातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकानी उड्या घेतल्यामुळे अखेरच्या दिवशी दोन्ही गटाकडून सदंस्य पदासाठी ८६ तर सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टोबरला निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाची आश्वी बुद्रंक ग्रामपंचायतीवर संत्ता होती. तर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील गटाचे कार्यकर्ते ही सत्तां आपल्याकडे खेचण्यासाठी एकास एक उमेदवार मैदानात उतरवत शर्थीचे प्रयत्न करणार आहे. नामदार विखे पाटील गटाचे उमेदवार हे जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर, माधवराव गायकवाड, विनायकराव बालोटे, भाऊसाहेब जऱ्हाड, रोहिनीताई निघुते, संजय गांधी, अजय ब्राम्हणे आदिच्या तर
थोरात गटाचे उमेदवार जेष्ठ नेते बाळकृष्ण पाटील होडगर, विजयराव हिगें, राहुल जऱ्हाड, महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार आहेत. हि निवडनूक ना. विखे व आ. थोरात गटासाठी अतिशय प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही गटाकडून निवडणूकीची व्यूहरचना सुरु करत मोर्चे बांधनीला वेग आल्याने गावात निवडणूकीचे वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.
ग्रामपंचायत सदंस्य पदाच्या १५ जागासाठी प्रभाग निहाय अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे..
प्रभाग १ :- आलम कासम शेख, विजय उर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे, चांद अहमद शेख, अमोल ज्ञानेश्वर वाकचौरे, रमेश मधुकर धर्माधिकारी, प्रशांत प्रकाश कोळपकर, राहुल बाबुराव जऱ्हाड, अझरुद्दीन सिकंदर शेख, बाळाराम भीमाशंकर सांगळे, अरुणा विजय उर्फ पांडुरंग हिंगे, सुनिता सुनील गायकवाड, राजश्री सोमनाथ गाडेकर, शोभा प्रविण ताजणे, स्नेहल सतिष जाधव, जयश्री विजय केदारी, प्रतिष्ठा रमेश गायकवाड, शांता विजय ब्राम्हणे, शितल अमोल गायकवाड, शितल दिलिप बोरुडे
प्रभाग २ :- अण्णासाहेब काशीनाथ जऱ्हाड, विशाल विनायक पाटील, भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर, बाळकृष्ण ठकाजी होडगर, राहुल बाबुराव जऱ्हाड, योगेश वसंत पिलगर, भाऊसाहेब रंगनाथ पिलगर, सुरेखा दत्तात्रय पंडित, प्रतिक्षा रमेश गायकवाड, प्रियंका राजु पिलगर, प्रिती आंतोन गायकवाड, मीना आंतोन गायकवाड, शीला सुखदेव गायकवाड, राधा योगेश पिलगर, रोहिणी राजकुमार जऱ्हाड, अलका भाऊसाहेब खेमनर, सविता महेंद्र जऱ्हाड, सारीका विशाल पाटील
प्रभाग ३ :- विजय उर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे, बबन भाऊराव शिंदे, बाळासाहेब उर्फ दामोदर नानासाहेब मदने, रविंद्र शिवाजी गायकवाड, विजय काशीनाथ म्हसे, रविंद्र मधुकर म्हसे, राहुल बाबुराव जऱ्हाड, कोमल शंकर माळी, भीमाबाई पांडुरंग यशवंत, भीमबाई भास्कर मोरे, ताई लक्ष्मण मोरे, उषा महेंद्र माळी, अंकुश काशीनाथ घोडके, विजय दादा केदारी, अनिल राधाकिसन कगंणकर, सागर लक्ष्मण घोडके
प्रभाग ४ :- बबन भाऊराया शिंदे, सोमेश्वर प्रभाकर गायकवाड, जानकीराम बबन गायकवाड, सुभाष भिकाजी चतुरे, विजय उर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे, अविनाश गिताराम गायकवाड, ठकाजी बंडू ताजणे, वेणूनाथ तात्याबा गायकवाड, गोरक्षनाथ पांडुरंग म्हसे, किशोर शिवाजी शिंदे, पुजा किसन हतांगळे, कुसुम राधु साळवे, कविता जानकीराम गायकवाड, मनिषा माधव शिंदे, नंदिनी सुभाष चतुरे, शीला शिवाजी हिंगे, पुजा राहुल राखपसरे
प्रभाग ५ :- अभिजित शंकर ताजणे, अमोल बाबासाहेब गायकवाड, संतोष रामदास ताजणे, वैभव एकनाथ ताजणे, दीपक उत्तम गायकवाड, किशोर शिवाजी शिंदे, महेश बाळासाहेब गायकवाड, प्रविण राधुजी गायकवाड, दर्शना संतोष ताजणे, सुरेखा शंकर ताजणे, सायली प्रसाद ताजणे, माधुरी संदीप ताजणे, परीगा बाबासाहेब गायकवाड, शितल अमोल गायकवाड, दिपिका रमेश गायकवाड, मीना प्रकाश गायकवाड यांनी सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान होऊ घातलेल्या निवडणूकीत आश्वी बुद्रुंकचे एकून ५ हजार ४०६ मतदान आहे. येथे सदंस्य पदासाठी ८६ उमेदवार तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ग्रावातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली असून २५ ऑक्टोबर रोजी म्हणजे माघारीच्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
तसेच या दाखल झालेल्या अर्जाची छाननी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सुरु होईल. उमेदवारी अर्ज २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यत मागे घेता येईल. यांचं दिवशी चिन्ह वाटप होणार असून मतदान ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत पार पडणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
प्रथम लोकनियुक्त सरपंच पदासाठी नामदेव किसन शिंदे, तान्हाजी रघुनाथ नांगरे, दीपक तुकाराम बर्डे, महेंद्र सुर्यभान माळी, दत्तात्रय भागवत पवार, रविंद्र सुभाष बर्डे यानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.