रविवारी सकाळी कोकणगाव शिवारात भिषण अपघात

संगमनेर Live
0
रविवारी सकाळी कोकणगाव शिवारात भिषण अपघात

◻️ तालुक्यातील दोघांसह एकूण तिघांचा मृत्यू ; ८ ते १० प्रवासी जखमी



संगमनेर LIVE | कोल्हार - संगमनेर राज्यमहामार्गावरील कोकणगाव शिवारात असलेल्या श्री क्षेत्र निझर्णेश्‍वर फाट्याजवळ साई भक्तांची ट्रॅव्हल बस व आंबे वाहतुक करणाऱ्या ट्रकचा रविवार दि. १५ जून २०२५ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भिषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार तर ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास निझर्णेश्‍वर फाट्याजवळ साई भक्तांची ट्रॅव्हल बस (एम एच ४६ सी यु २७५४) हि संगमनेर कडुन  लोणी कडे जात होती. त्यावेळी लोणी हुन संगमनेरकडे आंबे  घेऊन जात असलेला ट्रक (एम एच १२ एम एक्स १४५४) यांची समोरा - समोर जोरदार धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. 

यामध्ये प्रवीण सोपान  कांदळकर (वय २८, रा.  सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय ४६, रा. कासारा दुमला, ता. संगमनेर) आणि अंजुम प्रवीण वालमीकी (वय ३९, पाणीपत, हारीयाणा) हे तिघे जण ठार झाले आहेत. त्याचबरोबर हर्षिता सोनु वाल्मिक, पुनम बिर्ला, सोनिया बिर्ला, रिया चावरिया, ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील, लत्ता सुरेश चक्रनारायन (सर्व रा. मुंबई), प्रथमेश राजेंद्र कोल्हे (रा. पोहेगाव ता. कोपरगाव), मोहम्मद रफिक शेख (रा. नाईकवाडापुरा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

दरम्यान आपघाताचे वृत्त संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला समजताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस हेड काॅन्सटेबल राजेंद्र लांगे, हेड काॅन्सटेबल आशीष आठवडे, पोलीस हेडकाॅन्सटेबल सचिन उगले, पोलीस नाईक धनंजय महाले हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदत्तीने जखमींना उपचारासाठी संगमनेरला पाठवले असून अपघात कसा झाला याबाबत पुढील तपास सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !