प्रवरा पब्लिक स्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रदान

संगमनेर Live
0
प्रवरा पब्लिक स्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रदान

◻️ जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांकाने झाला गौरव

संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलला सन २०२४-२५ चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नुकताच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रवरा पब्लिक स्कूलने विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करून शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती केल्याबद्दल उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या विभागातून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या पुरस्कार सोहळ्यात प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या समवेत शिक्षक प्रतिनिधी म्हणून पर्यवेक्षिका सौ. एम. एस. जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी,  जी. एफ. मनियार हे उपस्थित होते.

या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, राहात्याचे गट शिक्षणाधिकारी राजेश पावसे, केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर उपस्थित होते.

पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतांना बी. बी. अंबाडे म्हणाले संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध उपक्रम प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर या ठिकाणी सुरू असतात. दर्जेदार शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा, शालैय उपक्रमाबरोबर विविध क्षेत्रात स्कूलने  स्वच्छ सुंदर शाळा, पर्यावरण संवर्धनासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमांच्या आयोजन करत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडवण्याचे काम स्कूलच्या माध्यमातून होत आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून यापुढेही स्कूलच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवण्यावर स्कूलचा भर बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव  भारत घोगरे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !