गुरुजींच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी - डॉ. विखे पाटील

संगमनेर Live
0
गुरुजींच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी - डॉ. विखे पाटील

◻️ सेवानिवृत्त तालुका हेडमास्तर एकनाथ सखाराम ताजणे यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा 

◻️ डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून ताजणे कुटुंबियांचे सांत्वन 

संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुका तसेच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त तालुका हेडमास्तर एकनाथ सखाराम ताजणे (वय - ७९) यांचे निधन झाल्यामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली. अशा भावना पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केल्या.

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी येथे ताजणे परिवाराची डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांत्वन भेट दिली. यावेळी ते म्हणाले “कै. एकनाथ ताजणे यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करत असंख्य पिढ्या घडवल्या. त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. शिक्षणाबरोबरच ते सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व गावविकास उपक्रमांमध्येही सक्रिय होते. आपण एक प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि जिव्हाळ्याचा शिक्षक गमावला आहे." अशा शोकभावना व्यक्त केल्या.

गुरुजींचा शैक्षणिक प्रवास..

ताजणे गुरुजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रेमगिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून केली. त्यानंतर ओझर बुद्रुक, दाढ खुर्द (हानुमंतवाडी), वनकुटे, मनोली, मांलुजे या शाळांमध्ये शिक्षक तसेच मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) आश्‍वी बुद्रुक येथे तब्बल १८ वर्षे तसेच पेमगिरी येथे १२ वर्षे सेवा देत त्यांनी पायाभूत सुविधा उभारणी, विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय, खेळाचे मैदान, तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली.

तालुका हेडमास्तर म्हणून त्यांनी संपूर्ण तालुक्यात शाळा दर्जावाढ मोहीम, शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पालक सभा आयोजन आणि शाळा सुशोभीकरण उपक्रम यशस्वीपणे राबवले. त्यांच्या पुढाकाराने अनेक शाळांना जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.

गुरुजींचा दृष्टिकोन केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या चारित्र्य घडणी, अनुशासन व मूल्य शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

दरम्यान या सांत्वन भेटीप्रसंगी पत्रकार वैभव ताजणे, प्रेस फोटोग्राफर सचिन ताजणे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी (लोणी बिट) पुष्पावती ताजणे, प्रतिक्षा डाके, गीतांजली भुजबळ, नामदेव ताजणे, सोमनाथ ताजणे, नितीन ताजणे, रामनाथ ताजणे, योगेश ताजणे, सरुनाथ उंबरकर, सरपंच सुशिला मेहेत्रे, दादा पाटील मेहेत्रे, युवा नेते संतोष मेहेत्रे, भानुदास पवार, अमोल ताजणे, नवनाथ ताजणे आदीसह ताजणे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !