संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील युटेक शुगर लि. या खाजगी कारखाण्याचा चतुर्थ सन २०२०-२१ या गळीत हंगाम शुभारंभ उद्या बुधवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. कारखाण्याचे संस्थापक अध्यक्ष रवीद्रं पुरूषोत्तम बिरोले यांच्या हस्तें कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव शेटे यानी दिली.
उद्या बुधवारी सकाळी होणाऱ्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखाण्याच्या संचालिका अश्विनीताई बिरोले, संचालक शंतनु बिरोले, संचालक एकनाथ नागरे, संचालक अँड. रामदास शेजुळ, संचालक संचालक हरिभाऊ गिते, संचालक सुभाष कोळसे आदिसह कारखाना प्रशासन व कामगार उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय नियमाचे पालन करुन या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.