संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात सोमवारी ३२ (२ नोव्हेंंबर) तर मंगळवारी २८ (३ नोव्हेंबर) बाधीत अशी एकून ६० कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली असून दोन्ही दिवस आश्वी परिसरातील गावनमध्ये बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवारी सापडलेल्या ३२ कोरोना बाधीत रुग्णामध्ये उंबरी येथे ३, आश्वी बुद्रुक येथे १, कनोली येथे १, सादतपूर येथे ४, रायतेवाडी येथे २, घारगाव येथे ३, कुंरकुडी बोटा येथे ४, राजापूर येथे ४, जोर्वे येथे २, साकुर येथे ३, घुलेवाडी येथे ३, पिपळगाव कोझिंरा येथे १ व वरंवडी पठार येथे १ असे एकून ३२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.
मंगळवारी सापडलेल्या २८ कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ८, उंबरी येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, पिपंरणे येथे २, निमगाव टेभीं येथे १, राजापूर येथे २, जोर्वे येथे २, घुलेवाडी येथे ७, साकुर येथे १, कोल्हेवाडी येथे १ व चंदनापूरी येथे १ असे एकून २८ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान सोमवार व मंगळवारी अशा दोन्ही दिवस आश्वी परिसरातील गावनमध्ये बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे नागरीकानी शासकीय नियमाचे पालन करुन खबरदारी घेणे गरजेचे आहे.