वनमंत्र्यांच्या दालनात लवकरचं राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या उपस्थितीत बैठक.
संगमनेर Live | संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर संगमनेर आणि अकोले तालुक्यातील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार १ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी कार्यरत असणाऱ्या वन कर्मचारी पात्र असूनही अन्यायकारक पद्धतीमुळे मागील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अपात्र राहिले असल्याचे सांगितले.
मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच वनमंत्र्यांच्या दालनात राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या उपस्थितीत बैठक लावून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत मंत्रालयात बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
या बैठकीस प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, संगमनेर युवक तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात, संगमनेर तालुका उपाध्यक्ष भरत ढेरंगे, रुग्णसेवक गणेश कणसे, प्रहार अपंग क्रांती तालुका उपाध्यक्ष नितीन भन्साळी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
******