◻ प्रत्येकाने किमान एक झाड लावावे - पो. नि. मांडवकर
संगमनेर Live | हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा कृषीदिन तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिन संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे वृक्षारोपन करुन साजरा करण्यात आला आहे.
यावेळी आश्वी चे पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी जनार्धन बोतले, आश्वी बुद्रुक चे उपसरपंच राहुल जऱ्हाड, पत्रकार रवीद्रं बालोटे तसेच स्टेट बँकेचे कर्मचारी श्रीमती तिडके, पाचोरे, तुषार, सुनील घोडेकर, रक्टे, कुऱ्हाडे, गणेश मुनमुने आदि यावेळी उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी उपस्थित असलेले पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर व स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी जनार्धन बोतले यानी प्रत्येक नागरीकानी या पावसाळ्यात किमान एक झाड लावुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले आहे.