संगमनेर रोटरीतर्फे राष्ट्रबांधणीचे शिल्पकार शिक्षक पुरस्कार जाहिर.

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यातील ११ प्रयोगशिल शिक्षकांना पुरस्कार ; गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांचा समावेश.

संगमनेर Live | आपण समाजासाठी देणे लागतो या भावनेतून संगमनेर रोटरी क्लब वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असते, याच प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्र बांधणीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या प्रयोगशिल शिक्षकांचा सन्मान केला जावा, त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

यासाठी संगमनेर तालुक्यातील ११ शिक्षकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांची घोषणा शिक्षक दिनाच्या दिवशी करण्यात आली असून रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण रोटरी नेत्र रुग्णालय येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नंदुरबार येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, नगरविकास विभाग मंत्रालय, मुंबईचे उपसचिव विजयराव चौधरी, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, सेक्रेटरी हृषिकेश मोंढे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

पुरस्कार देतांना शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान, मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख रो. नरेंद्र चांडक व रो. सुनिल घुले यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये कैलास केदु पवार (गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, पंचायत समिती, संगमनेर), शैलजा पंढरीनाथ फटांगरे (मुख्याध्यापक, आनंदवन विद्यालय, घुलेवाडी), पांडूरंग देवगीर गोसावी (मुख्याध्यापक, जि. प. प्रा शाळा कौठे कमळेश्वर), दत्तु भिकाजी आव्हाड (उपाध्यापक, नगरपालिका  शाळा क्र.१, संगमनेर), श्रीमती शायदा हसन शेख (उपाध्यापक, जि. प. प्रा. शाळा साकुर), उमेश रामनाथ काळे (उपाध्यापक, जि. प. प्रा. शाळा, कासारा दुमाला), श्रीमती स्वाती बबन भोर (उपाध्यापक, जि. प. प्रा. शाळा बोटा), संदिप सुधाकर पोखरकर (उपाध्यापक, जि. प. प्रा. शाळा, तळेगाव), प्रिती कारभारी खालकर (उपाध्यापक, जि. प. प्रा. शाळा रहिमपूर बंधारा), बाळासाहेब सुखदेव भागवत (जि. प. प्रा. शाळास पिंपळगाव माथा), श्रीमती योगिता लक्ष्मण वडनेरे (जि. प. प्रा. शाळा गुंजाळमळा, निमज) आदिंचा समावेश आहे.

दरम्यान नवीन पिढी घडविण्यात महत्वाचा वाटा असलेले शिक्षकांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे या भावनेतून हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. कोविडचे सर्व नियम पाळून ठरावीक निमंत्रीतांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !