◻ संगमनेर तालुक्यातील भूमीपुत्राच्या साहीत्य कृती व लेख संग्रहाचा गौरव.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी साहीत्य, कलागौरव आणि प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्याची परंपरा मागील तीस वर्षापासून अखंडीतपणे सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते पद्मश्रीच्या जयंतीदीनी नारळी पौर्णिमेला हे पुरस्कार प्रदान केले जातात.
कोव्हीड संकटामुळे मागील वर्षी साहीत्य पुरस्कार सोहळा होवू शकला नाही. यंदाही तीच परीस्थीती कायम असल्याने सांस्कृतिक कार्यक्रमावर सरकारचे निर्बंध कायम आहेत. तसेच दोन्ही वर्षाचे साहीत्य संमलेनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो आणि डॉ. जयंत नारळीकर यांनी तब्येतीच्या कारणाने कार्यक्रमास उपस्थित राहाण्यास असमर्थता दर्शविल्याने सर्व पुरस्कारप्राप्त साहीत्यिक कलाकारांना घरी जावूनच सन्मानित करण्याचा निर्णय आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परीवाराने घेतला.
संगमनेर तालुक्याचे भूमीपुत्र आणि जेष्ठ नाट्य दिग्दर्शक डॉ. सोमनाथ मुटकूळे यांच्या पुन्हा क्रांतीज्योती या साहीत्य कृतीस आणि संगमनेर महाविद्यालयातील प्रा. अशोक लिंबेकर यांच्या वय कोवळे ऊन्हाचे या ललित लेख संग्रहास अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहीत्य पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, रुपये १० हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या दोन्ही पुरस्कार्थीचा गौरव डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे, डॉ. दिनकर गायकवाड, प्रवरा सहकरी बॅकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर यांनी प्रवरा परीवाराच्या वतीने निवासस्थानी जावून पुरस्कार प्रदान केला.
माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जेष्ठ नेते माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ रावसाहेब कसबे समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. राजेंद्र सलालाकर यांनी डॉ. मुटकूळे आणि प्रा. लिंबेकर यांचे अभिनंदन केले आहे.
पद्मश्रीनी ग्रामीण भागात उभे केलेले काम हे पुरोगामी विचाराची बांधणी करणारे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार नवी प्रेरणा देणारा वाटतो. कारण संत तुकाराम महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर मी केलेले लिखाण हे पुरोणामित्वाचा विचार पुढे घेवून जाणारे असल्याची प्रतिक्रिया डॉ. सोमनाथ मुटकूळे यानी दिली आहे.
महाराष्ट्राच्या साहीत्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा व अग्रगण्य म्हणून लौकीक असलेल्या पुरस्काराने शिक्षक दिनी माझा सन्मान व्हावा मला विलक्षण आनंद झाला आहे. प्रवरा परीवाराच्या कल्पक नियोजनाचा मला अभिमान वाटतो. अशा भावना प्रा. अशोक लिंबेकर यानी व्यक्तं केल्या आहे.