आजी - माजी आमदार कोकणगाव येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले

संगमनेर Live
0
आजी - माजी आमदार कोकणगाव येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले

◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस  

◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाला मदतीच्या सूचना



संगमनेर LIVE | संगमनेर - कोल्हार राज्यमार्गावर कोकणगाव शिवारातील श्री क्षेत्र निझर्णेश्वर फाट्याजवळ रविवारी सकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा भिषण अपघात झाला होता. यामध्ये तिनं जणांचा मृत्यू आणि बहुतेक प्रवासी हे जखमी झाले आहे. 

या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक कार्यकर्त्यासह यशोधन कार्यालयाला तात्काळ जखमींना मदत करण्याच्या सूचना दिल्या. तर, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी देखील तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस करुन उपचाराची माहिती जाणून घेतली.

रविवारी सकाळी झालेल्या अपघातात संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील सोपान कांदळकर, फिरोज लाला शेख या दोघांसह हरयाणा येथील अंजू वाल्मिकी यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी बहुतांश प्रवासी हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळीचं या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक कार्यकर्त्याना तातडीने घटनास्थळी जाऊन मदतीच्या सूचना दिल्या. तसेच इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाकडून जखमीच्या उपचारासाठी योग्य ते प्रयत्न सुरू आहेत.

आमदार अमोल खताळाकडून जखमीना धीर..

कोकणगाव शिवारातील भिषण आपघाताची माहिती आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली असून त्यांनी स्वतः संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात जाऊन अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस करत रुग्णांना धीर दिला. तसेच डॉक्टरांकडून जखमीवरील उपचाराची माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत.


Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !