बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात
◻️ पुणे - नाशिक महामार्गावरील माझे घर सोसायटीजवळील उड्डाणपुलाच्या कामाने घेतला वेग
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विकासाच्या अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. नाशिक पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेट समोर उड्डाणपूल अत्यंत गरजेचा होता. यासाठी बाळासाहेब थोरात यांनी ३८ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. हे काम आता अत्यंत वेगाने सुरू असून अंतिम टप्यात आले आहे.
संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी व्हावी याकरता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन दळणवळण मंत्री सी. पी. जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून ९ किलोमीटर लांबीचा बिना टोल बायपास मंजूर करून घेतला व हा बायपास २०१४ मध्येच नागरिकांसाठी खुला केला. यामुळे शहरातील वाहतूक बाह्य मार्गाने वळवली गेली. याचबरोबर घुलेवाडी सुकेवाडी हा बायपास केल्याने अनेक वाहतूक त्या मार्गाने ही वळवली गेली.
याचबरोबर संगमनेर शहरासाठी इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हॅपी हायवे रस्ता सुशोभीकरणासह पूर्ण करू संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकली.
घुलेवाडी येथील माझे घर सोसायटी लगत असलेल्या पुणे - नाशिक महामार्गावरून संगमनेर कडे येताना व या महामार्गावर जाताना रस्त्याच्या गुंतागुंतीमुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र झाला होता. या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय दळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपल्या वैयक्तिक संबंधातून विशेष पाठपुरावा करून या उड्डाणपुलाच्या कामाकरता ३८ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.
मात्र एका बाजूचा पूल काही कारणास्तव प्रलंबित राहिला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा या कामाकरता पुढाकार घेऊन हे काम सुरू केले. यामध्ये स्थानिकांना सोबत घेऊन त्यांचेही अनेक प्रश्न मार्गी लावले.
आता या नाशिक जंक्शनवर दुसऱ्या बाजूने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने बायपास सुद्धा तयार करण्यात आले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार असून हे काम अंतिम टप्यात आले आहे. यामुळे माझे घर सोसायटी सह घुलेवाडी ग्रामस्थ, आदर्श नगर, वेल्हाळे, सायखिंडी, चिकणी, मालदाड या स्थानिक नागरिकांसह नाशिककडे जाणाऱ्या व नाशिक वरून संगमनेरकडे येणाऱ्या नागरिकांची दळणवळणासाठी मोठी सोय होणार आहे.
संगमनेर तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या उड्डाणपुलाच्या कामाच्या गतीमुळे स्थानिक परिसरातील नागरिकांनी बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे हा उड्डाणपूल..
नाशिक - पुणे चौपदरीकरण महामार्ग लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केला. या महामार्गावर माझे घर सोसायटी जवळ उड्डाणपूल व्हावे ही नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेऊन आणि अपघात टाळण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी मोठा उड्डाण पूल मंजूर केला असून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडून दिवाळीपूर्वीच त्यांनी या कामाला गती दिली आहे. येत्या काही दिवसात हा पूल पूर्ण होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.