दुष्ट बुद्धीने फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा
◻️ संगमनेर काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागील ४० वर्ष अथक प्रयत्नातून संगमनेर तालुका वैभवशाली बनवला. तालुक्याचा लौकिक राज्यात वाढवला. मात्र आता काही विघातक शक्ती या तालुक्याची संस्कृती मोडू पाहत आहे. अशांना वेळीच शासन करा. अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी अजय फटांगरे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, सुरेशराव झावरे, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. प्रमिलाताई अभंग, अंकुश ताजणे, गणेश मादास, मुजिन खान, बाळासाहेब पवार, भरत कळसकर, युनूस शेख, शहाबाजअली शेख, ज्ञानेश्वर राक्षे, गणेश बलसाने, राजेंद्र वाकचौरे, अँड. प्रमोद कडलग, किशोर टोकसे, जीवन पंचारिया, प्रशांत अभंग, सौरभ कडलग, वैष्णव मुर्तडक, अमित गुंजाळ, विजय उदावंत, सुभाष दिघे, अन्सार सय्यद, प्रमोद गणोरे, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, गजेंद्र नाकील, जावेद पठाण यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील आठवड्यात तालुक्यातील श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा फोटो असलेला भक्तांचे स्वागत करणारा फ्लेक्स लावण्यात आला होता. समाजातील दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी सदर फ्लेक्स फाडून लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा अपमान केला. याबद्दल तातडीने कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर फ्लेक्स फाडण्याच्या वाईट प्रवृत्तीची पुनरावृत्ती काल परत झाली. संगमनेर शहरांमध्ये माळुंगी नदी नजीक श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ नागपंचमीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनर वर लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा फोटो असलेला व शिवभक्तांना शुभेच्छा देणारा फ्लेक्स फाडण्यात आला. हा लोकनेते बाळासाहेब थोरात आणि भक्तगण यांचा अपमान आहे. त्यामुळे जे दोषी असतील त्यांना तातडीने अटक करून कारवाई करावी. असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी विश्वासराव मुर्तडक म्हणाले की, संगमनेर तालुका हा संस्कृत तालुका आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागील ४० वर्ष सातत्यपूर्ण योगदानातून हा तालुका वैभवशाली बनवला. विरोधकांची देखील क्षकधी अडवणूक केली नाही. मात्र, आता दुर्दैवाने काही दृष्ट प्रवृत्ती या तालुक्याची संस्कृती मोडू पाहत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे फ्लेक्स फाडले जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही. दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी निवेदन स्वीकारून आवश्यक ती चौकशी करण्याचे आश्वासन दिले.