जयश्री थोरात यांनी २ हजार ४०० युवकांना बांधल्या राख्या!

संगमनेर Live
0
जयश्री थोरात यांनी २ हजार ४०० युवकांना बांधल्या राख्या!

◻️ सलग सहा तास चाललेल्या रक्षाबंधनात ७ हजार २२६ वह्याची ओवाळणी 

संगमनेर LIVE | भाऊ बहिणीच्या नात्याचा अत्यंत पवित्र सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त संगमनेर तालुक्यातील २ हजार ४०० युवकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी येऊन डॉ. जयश्री थोरात यांच्याकडून राखी बांधून घेतली. याचबरोबर ओवाळणी मध्ये दिलेल्या वह्याचे गरीब विद्यार्थिनींना वाटप केले जाणार असल्याची माहिती डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.

रक्षाबंधननिमित्त सुदर्शन निवासस्थानी शहरातील आणि ग्रामीण भागातून आलेल्या युवकांनी मोठी गर्दी होती. यावेळी ओवाळणी निमित्त कोणीही हार बुके न आणता एक वही आणावी असे आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील हजारो युवकांनी आपल्या सोबत एक वही आणत डॉ. जयश्री थोरात यांना ओवाळणी दिली.

यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी सलग सहा तास उभे राहत तालुक्यातुन भावांना राखी बांधण्याचा विक्रम केला. याप्रसंगी तब्बल २ हजार ४२२ युवकांनी राख्या बांधून घेतल्या.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, भारतीय परंपरा ही अत्यंत समृद्ध आहे विविधतेने नटलेली आहे. बहिण भावाच्या नात्याचा हा पवित्र दिवस मोठ्या आनंदाने संगमनेर मध्ये साजरा होत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समता, बंधुता आणि सर्व धर्मसमभाव जोपासत संगमनेर तालुका पुढे जात असून सर्व युवकांनी हीच परंपरा पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. ओवाळणी मध्ये आलेल्या सर्व वह्या ह्या तालुक्यातील गरीब विद्यार्थिनींना देण्यात येणार असल्याच्या त्या म्हणाल्या.

एक वही बहिणीसाठी..

रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी मध्ये एक वही आणावी हे डॉ. जयश्रीताई थोरात मित्र मंडळांनी केलेल्या आव्हानाला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत ७ हजार २२६ वह्या जमा झाल्या. तर, या वह्या तालुक्यातील गरीब विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !