स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

संगमनेर Live
0
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे राहणार उपस्थितीत

संगमनेर LIVE | देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवार दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता माजी मंत्री  बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार असल्याची माहिती व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी दिली.

पांडुरंग घुले म्हणाले की, माजी शिक्षण व कृषि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने कायम सभासद शेतकरी कामगार व ऊस उत्पादक यांचे हित जोपासले असून उच्चांकी भाव दिला आहे. ५५०० मेट्रिक टन व ३० मेगा वॅट वीज निर्मिती असा नवीन प्रोजेक्ट राज्यासाठी दिशादर्शक ठरलेल्या या कारखान्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अद्यावत व सर्व सोयीयुक्त नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे. 

कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही भव्य इमारत असून या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोरात, केरुजी हरुजी गुंजाळ, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ या सर्व माजी चेअरमन यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार सत्यजीत तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

दरम्यान या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !