सर्वसामान्य जनतेवर कुठलेही विघ्न येऊ नये - आमदार अमोल खताळ
◻️विविध गणेश मंडळाच्या गणरायाची आमदार खताळा यांच्या हस्ते आरती
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेचे आरोग्य सुखी समाधानी ठेवा. त्यांच्यावर कुठल्या ही प्रकारचे विघ्न येऊ देऊ नका. तसेच मला विकास कामे पूर्ण करण्याची शक्ती द्या. असे साकडे आमदार अमोल खताळ यांनी गणपती बाप्पाच्या चरणी घातले.
संगमनेर शहरातील शमी महागणपती राजमुद्रा प्रतिष्ठान पारिजात कॉलनी मित्र मंडळ, नवनिर्माण मित्र मंडळ, संग्राम मित्र मंडळ, मराठा मित्र मंडळ, कुंदन मित्र मंडळ, श्रीराम तालीम मित्र मंडळ, बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ शिवसेना शाखा कुंभारआळा मित्र मंडळ, सुतार गल्ली मित्र मंडळ, रामनगर मित्र मंडळ शिवाजीनगर मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, टेंभी नाका तरुण मित्र मंडळ, वक्रतुंड प्रतिष्ठान पार्क मित्र मंडळ, शिवाजीनगर तरुण मित्र मंडळ, साईनगर हिंदू तरुण मित्र मंडळ, जय बजरंग वडार मित्र मंडळ या गणेश मंडळासह शहरातील विविध गणेश मंडळांच्या गणरायाची आरती आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आली.
दरम्यान यावेळी महायुतीचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.