शेडगाव येथील शाळेचा विकास माजी विद्यार्थ्याच्या योगदानातून प्रगतीपथावर

संगमनेर Live
0
शेडगाव येथील शाळेचा विकास माजी विद्यार्थ्याच्या योगदानातून प्रगतीपथावर 

◻️ दानशूर ग्रामस्थं आणि विद्यार्थ्याकडून शाळेसाठी अत्याधुनिक सेवा सुविधांसाठी पुढाकार 

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयाचा विकास माजी विद्यार्थी आणि गावातील दानशूर ग्रामस्थ्यांच्या योगदानामुळे गतिमान झाला आहे. शेडगाव शाळेतील अनेक माजी विद्यार्थी हे राज्य आणि देशभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. या सर्व विद्यार्थ्यानी आपल्या मातृशाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे शाळेच्या उभारणीसाठी मदतीचा हात दिला. अशी माहिती मुख्याध्यापक अशोक गिते यांनी दिली.

माजी विद्यार्थ्याच्या योगदानातून शाळेत नवनवीन शैक्षणिक साधने, इंटिरिऍक्टिव्ह पॅनल, वायफाय मोडेम, निसर्गरम्य बाग, ताशी २५० लिटर शुद्ध पाणी पुरवठा करणारे सयंत्र, इन्व्हर्टर, पाणी साठविण्यासाठी जार व क्रीडा साहित्य उपलब्ध झाले आहे. अलीकडेच अनेक माजी विद्यार्थ्यानी व्हाट्सअँप गृपच्या माध्यमातून एकत्र येऊन आणखी विकासकामांचा संकल्प केला आहे.

मुख्याध्यापक अशोक गिते यांनी सांगितले की, “माजी विद्यार्थ्याचा व ग्रामस्थ्यांच्या सहकार्याचा हातभार हा शाळेच्या सर्वागीण प्रगतीसाठी महत्वाचा आहे. त्यांच्यामुळे शाळेतील विद्यार्थी नवीन उमेदीने शिक्षण घेत आहेत.”

दरम्यान या उपक्रमामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी विद्यार्थ्याचा हा आदर्श इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !