सेवा समितीची वचनपूर्ती; विजयाचा गुलाल उधळला, पण फ्लेक्सचा अतिरेक टाळला

संगमनेर Live
0
सेवा समितीची वचनपूर्ती; विजयाचा गुलाल उधळला, पण फ्लेक्सचा अतिरेक टाळला

◻️ संगमनेर शहराचा श्‍वास झाला मोकळा; थोरात - तांबे जोडीने जपली सुसंस्कृत परंपरा!


​संगमनेर LIVE | ​लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कल्पकतेतून आणि ऐतिहासिक विकासकामांतून संगमनेर शहर आज राज्यात अग्रगण्य बनले आहे. विशेषतः शहराचे ‘हायटेक’ बस स्थानक ही जिल्ह्याची मोठी ओळख आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी दिलेला शब्द पाळत, ऐतिहासिक विजयानंतरही शहरात फ्लेक्स बंदी कायम ठेवली आहे. यामुळे बस स्थानक परिसरासह मुख्य रस्त्यांनी अनेक दिवसांनंतर मोकळा श्‍वास घेतला आहे.

​नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि २७ नगरसेवकांना शहरवासीयांनी विक्रमी मताधिक्याने विजयी केले. डॉ. तांबे यांचा १६,६४४ मतांचा विजय हा महाराष्ट्रातील अव्वल विजयांपैकी एक ठरला. इतक्या मोठ्या यशानंतरही सेवा समितीने कुठेही फ्लेक्सबाजी न करता आपले पहिले वचन पूर्ण केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हा ‘जनतेचा विजय’ असल्याचे सांगत कार्यकर्त्याना संयमित जल्लोषाचे आवाहन केले होते.

​निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी शहराचे विद्रूपीकरण थांबवण्याचे संकेत दिले होते. दिवाळीपूर्वी त्यांनी स्वतःचे फ्लेक्स स्वतः काढून एक आदर्श घालून दिला होता. राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असतानाही बाळासाहेब थोरात यांनी अनेकदा कार्यकर्त्यानी लावलेले स्वतःचे फ्लेक्स काढायला लावले होते. याच वारशाचे जतन करत आमदार तांबे यांनी प्रशासनाला अनधिकृत फ्लेक्सवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

​गेल्या काही काळापासून ज्यांचे समाजकार्यात कोणतेही योगदान नाही, अशा काही तथाकथित पुढार्‍यांनी शहरात फ्लेक्सची चढाओढ लावली होती. अगदी थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अडथळे निर्माण केले होते. या विरोधात अनेक समाजसेवी संस्था, युवक संघटना आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनेही केली होती. आता प्रशासकीय कडकडीत अंमलबजावणीमुळे अशा फ्लेक्सबाजांना मोठी चपराक बसली आहे.

​“संस्कृत संगमनेरकरांना ही फ्लेक्सबाजी कधीच मान्य नव्हती. सेवा समितीच्या विजयानंतरही फ्लेक्स न लावण्याच्या निर्णयामुळे शहराचे सौंदर्य टिकून राहिले आहे. या अभिनव उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो.” असे अनिकेत घुले व रमेश गफले यांनी म्हटले आहे.

दरम्यान ​शहरातील मुख्य चौक आणि बस स्थानक परिसर आता जाहिरातींच्या विळख्यातून मुक्त झाला असून, या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !