पोखर्डी येथे ‘ग्रामीण कृषी जागरूकता’ चर्चासत्र उत्साहात संपन्न

संगमनेर Live
0
पोखर्डी येथे ‘ग्रामीण कृषी जागरूकता’ चर्चासत्र उत्साहात संपन्न

◻️​ डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयांकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. 

सदर चर्चासत्र २८ जानेवारी २०२६ रोजी संत तुकाराम महाराज विठ्ठल मंदिर येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद गावचे सरपंच अंतू वारुळे यांनी भूषवले.

​कार्यक्रमात तज्ज्ञ व्याख्यात्यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. पाथर्डीचे उपकृषी अधिकारी बाळासाहेब काकडे यांनी कांदा बीजोत्पादनाविषयी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. सहाय्यक प्राध्यापक डॉ. ईश्वर घटुळ यांनी संत्रा फळबाग व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला.

तर, सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र कर्डिले यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी जेूर भाग-१ चे उपकृषी अधिकारी सतीश गोसावी आणि कृषिमित्र सुनील कराळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

​या चर्चासत्रास महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे यांच्यासह गावातील प्रगतशील शेतकरी सुनील वारुळे, संतोष मगर, कराळे बाबासाहेब, कराळे देविदास, कराळे अजय, वाघ पोपट, ठोंबरे भानुदास, काकडे भानुदास यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विळद घाट फाउंडेशनचे संचालक प्रा. सुनील कल्हापुरे आणि प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी केले. 

दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिदूत अभिजीत दरंदले यांनी केले, तर शेवटी राजेंद्र कर्डिले यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदूत प्रणव घुमरे, अजिंक्य कोते, उदय शितोळे, ज्ञानेश्वर साठे आणि कपिल पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !