धांदरफळ बुद्रुकच्या श्री विठोबा मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

संगमनेर Live
0
धांदरफळ बुद्रुकच्या श्री विठोबा मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश!


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील ऐतिहासिक व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठोबा मंदिराला अखेर ‘क’ वर्ग दर्जा जाहीर करण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांनी या मंदिरास ‘क’ प्रवर्गाचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विठोबा मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा जाहीर केला. त्यामुळे आता या मंदिर परिसराचा सर्वागीण विकास होण्यास मदत होणार आहे.

धांदरफळ बुद्रुक गावासह परिसरातील भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे केंद्र आहे. मात्र आतापर्यत मंदिराच्या विकासासाठी आवश्यक शासकीय निधी व सुविधा मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत होत्या. या मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आता मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज व्यवस्था, दर्शन रांगा तसेच अन्य आवश्यक विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. धांदरफळ बुद्रुक ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे मंदिराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !