रामनवमीनिमित्त मांची हिलच्या पायथ्याशी बैलगाडा शर्यतींचा थरार!

संगमनेर Live
0
रामनवमीनिमित्त मांची हिलच्या पायथ्याशी बैलगाडा शर्यतींचा थरार!

​◻️ शर्यतीच्या चित्तथरारक कौशल्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध

संगमनेर LIVE | राम नवमी उत्सवाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक शिवारातील मांची हिलच्या निसर्गरम्य पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक बैलगाडा शर्यतींना उपस्थित प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २७) मांची हिल परिसरात विशेष रीतीने तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर सकाळपासूनच बैलगाडा मालक आणि शौकिनांची लगबग सुरू झाली होती. यावेळी, पंचक्रोशीसह जिल्ह्यातून आलेले दिग्गज बैलगाडा मालक आणि त्यांचे नामवंत बैलांच्या उपस्थितीमुळे आसमंत दणाणून गेला.

​शर्यतीला सुरुवात होताच बैलगाड्या, आणि वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या बैलांनी तसेच घोड्यांनी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. बैलांचा वेग आणि त्यांना नियंत्रित करणारे चालकांचे कौशल्य पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात मैदानाचा परिसर दणाणून सोडला. अनेक फेऱ्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, जिथे सेकंदाच्या फरकाने विजेते ठरले.

यावेळी ​शर्यतींमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने आकर्षक पारितोषिके आणि रोख रक्कमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.​ दरम्यान या बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडल्या आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !