चिंचपूर येथील आदर्श माता मुक्ताबाई जयवंत थेटे यांचे शनिवारी प्रथम पुण्यस्मरण
◻️ ह.भ.प. गोरक्ष महाराज देठे यांचे ‘अमृततुल्य' कीर्तन
संगमनेर LIVE | अध्यात्म आणि धार्मिकतेचा वसा आयुष्यभर जपणाऱ्या, वात्सल्याची मूर्ती आणि थेटे पाटील कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या आदर्श मातोश्री कै. सौ. मुक्ताबाई जयवंत पाटील थेटे यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार, दिनांक ०७ मार्च रोजी होत आहे. या निमित्ताने चिंचपूर (ता. संगमनेर) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मातोश्री मुक्ताबाईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी लोणी - संगमनेर रस्त्यावरील श्री दत्त लॉन्स (चिंचपूर फाटा) येथे पुण्यस्मरण सोहळ्याचे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप गोरक्ष महाराज देठे यांच्या सुश्राव्य वाणीतून ‘अमृततुल्य’ हरी कीर्तन पार पडणार आहे.
कै. सौ. मुक्ताबाई थेटे यांनी केवळ कुटुंबालाच नव्हे, तर, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांना आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि धार्मिक वृत्तीने जोडले होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबाची झालेली हानी कधीही भरून न येणारी असली, तरी त्यांनी दिलेले संस्कार आजही त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये दिसून येतात.
या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पती जयवंत रामचंद्र थेटे, मुलगा नंदू जयवंत थेटे, सून सौ. दिपाली नंदू थेटे, सून गं. भा. आशा चंद्रभान थेटे, मुली सौ. यमुना जगन्नाथ तांबे व सौ. शकुंतला नारायण तांबे तसेच पुतणे अण्णासाहेब गोविंद थेटे, विठ्ठल तबाजी थेटे, कारभारी रावजी थेटे, लक्ष्मण तबाजी थेटे, शिवाजी रावजी थेटे, दत्तात्रय गोविंद थेटे, रामभाऊ तबाजी थेटे, आप्पासाहेब तबाजी थेटे यांच्यासह नातवंडे चि. कुनाल चंद्रभान थेटे, चि. अभिराज नंदू थेटे, कु. अंजली चंद्रभान थेटे, कु. आराध्या नंदू थेटे आणि समस्त थेटे पाटील कुटुंबियांनी केले आहे.
दरम्यान आदर्श मातोश्री कै. सौ. मुक्ताबाई जयवंत पाटील थेटे यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चिचंपूर ग्रामस्थांसह संगमनेर लाईव्ह परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली!