उद्यापासून गुंजाळवाडीत गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात

संगमनेर Live
0
उद्यापासून गुंजाळवाडीत गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात

◻️ ​रामराव महाराज ढोक यांची राम कथा; सोबत १०५ कंपन्यांचा ‘गगन भरारी कृषि महोत्सव'

​संगमनेर LIVE | अधिक मासानिमित्त संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे उद्या, सोमवार दि. ८ जून ते १५ जून या कालावधीत ‘स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यात अध्यात्मासोबतच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड देणारा ‘गगन भरारी कृषि महोत्सव’ देखील तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

सात दिवस चालणाऱ्या या सप्ताह काळात रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या अमृतवाणीतून भाविकांना रामायण कथा श्रवण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, प्रवचने आणि व्याख्याने होणार आहेत. सप्ताहात ज्ञानेश्‍वरी पारायण आणि हरिपाठाचेही आयोजन करण्यात आले आहे.

१० जून रोजी जगतगुरु शंकराचार्य यांच्या पवित्र पादुका दर्शनासाठी सप्ताह स्थळी दाखल होणार आहेत. तालुक्यातील तमाम भाविकांनी मोठ्या संख्येने या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

सप्ताह कालावधीत नंदकुमार पोवार, इंद्रजीत देशमुख, डॉ. संजय मालपाणी, भास्कर पेरे आणि शालिनीताई देशमुख यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच समाधान महाराज शर्मा, संजय महाराज पाचपोर, जयंत महाराज पाटील, विशाल महाराज खोले, सोमनाथ महाराज सानप आणि उध्दव महाराज मंडलिक यांची कीर्तने होणार असून, सप्ताहाची सांगता निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

दरम्यान, सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘गगन भरारी कृषि महोत्सवात’ तब्बल १०५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यां सहभागी होणार आहेत. यावेळी आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषिपूरक उद्योग आणि नवनवीन संशोधनांची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे. त्यामुळे भाविकांसह ग्रामीण भागातील बळीराजासाठी देखील सप्ताह सोहळा हा अध्यात्म आणि विकासाची पर्वनी ठरणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !