संगमनेरच्या भूमीत ‘कोकण’ अवतरल्याची अनुभूती!

संगमनेर Live
0
संगमनेरच्या भूमीत ‘कोकण’ अवतरल्याची अनुभूती!

◻️प. पू. गगनगिरी महाराजांचे नातू संजय पाटणकराचे गौरवोद्गार 


​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित ‘प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहा’चा शुभारंभ अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.

हठयोगी आणि सिद्धयोगी गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आयोजित या सोहळ्याच्या निमित्ताने ‘संगमनेरची भाकरी आणि कोकणची आमटी’ यांचे सुंदर एकीकरण अनुभवायला मिळाले, असे प्रतिपादन गगनगिरी महाराजांचे नातू संजय पाटणकर यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना संजय पाटणकर म्हणाले की, “हा सप्ताह सर्वांचा आहे, यासाठी कोणत्याही खास आमंत्रणाची गरज नाही. गगनगिरी महाराजांच्या इच्छेनेच सर्व कार्य घडत असते. आपण केवळ निमित्तमात्र आहोत." त्यांनी उपस्थितांना अहंकार बाजूला ठेवून इतरांना मोठे करण्याचे काम करण्याचे आवाहन केले. आज पेरलेले भक्तीचे हे बीज भविष्यात वटवृक्षासारखे बहरून समाजाला सुसंस्काराची फळे देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी संजय पाटणकर आणि सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने ‘वीणा पूजन’ आणि महाआरती पार पडली. यानंतर उपस्थित भाविकांनी कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !