अकोले तालुक्यातून ६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कार जप्त

संगमनेर Live
0
अकोले तालुक्यातून ६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कार जप्त

◻️ संगमनेरच्या उपविभागीय कार्यालयाची कारवाई; तरूणावर गुन्हा दाखल

संगमनेर LIVE | संगमनेर उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख ११ हजार २३० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी शोएब काझी (रा. कोतुळ, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरलेली स्वीप्ट कारही पोलिसांनी जप्त केली आहे.

​मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना कोतुळ गावात गुटखा विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

​पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाप्पुसाहेब हांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग, पोलीस कॉन्स्टेबल राहूल सारबंदेव, पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे यांच्या पथकाने पंचासमक्ष कोतुळ येथील शोएब काझी याच्या घराजवळ छापा टाकला. त्यावेळी त्याच्या ताब्यातील स्वीप्ट कारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखू आढळून आली. पोलिसांनी हा सर्व साठा आणि गाडी जप्त केली.

​या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुरनं ४८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, ​सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !