रविवारच्या दिलाशानतंर सोमवारी पुन्हा कोरोना बांधीताचा आकडा वाढला.

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यात आढळले आज ३२ कोरोना बांधीत रुग्ण.

संगमनेर Live | रविवारी अवघे १९ बांधीत रुग्ण आढळल्याने संगमनेरकराना मोठा दिलासा मिळाला होता. परंतू सोमवारी (१२ ऑक्टोबर) रोजी पुन्हा तालुक्यात ३२ कोरोना बांधीत रुग्ण आढळल्याने मिळालेला दिलासा हवेतचं गायब झाला आहे. विशेष म्हणजे आश्वी परिसरातील एकाही गावात आज बांधीत रुग्ण आढळून आलेला नाही.

सोमवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ५, संगमनेर खुर्द येथे १, केळेवाडी येथे २, शेळकेवाडी येथे १, भोजदरी येथे १, कुरकुटवाडी येथे २, आंबी दुमाला येथे १, अकलापूर येथे ४, आनंदवाडी येथे ८, चंदनापूरी येथे १, झोळे येथे १, जवळे बाळेश्वर येथे १, गुंजाळवाडी पठार येथे १, जवळे कडलग येथे १,तळेगाव येथे १ व वडगावपान येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ३२ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.

दरम्यान आश्वी परिसरातील एकाही गावात आज बांधीत रुग्ण न आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !