रिपाईचे खंदे समर्थक दिलिपराव मुन्तोडे काळाच्या पडद्याआड.

संगमनेर Live
0
संगमनेर Live (राजेश गायकवाड) | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील रहिवासी व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले याचे खंदे समर्थक तसेच रिपब्लिकन पक्षाचे उत्तर राज्य उपाध्यक्ष दिलीपराव दौलत मुन्तोडे (वय ५२) यांचे नुकतेचं अल्पशा आजाराने निधन झाले असून त्याच्या निधनामुळे रिपाईच्या सच्चा कार्यकर्ता गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दिलीपराव मुन्तोडे हे परखड व आक्रमक व्यक्तीमत्व म्हणून संगमनेर तालुक्यात परिचित होते. त्याचे सर्व राजकिय पक्षातील नेते, कार्यकर्त यांच्याशी मैत्री पुर्ण त्यांचे संबंध होते. बालपणापासून सामाजिक कार्याची गोडी असल्याने दलित चळवळी पासून ते ना. रामदास आठवले यांचे विश्वासू कार्यकर्त होते. रिपब्लिकन पक्षाच्या विविध पदावरुन काम करताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये कार्यकर्त्याचा मोठा संच त्यानी उभा केला. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांना सामाजिक बांधिलकी प्राधान्य क्रमाने जपली. जिल्ह्यातील फाटका - तुटका कार्यकर्ता त्यांच्याकडे काम घेवून येत असे. अहमदनगर जिल्ह्यामधील ना. रामदास आठवले यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते जिल्ह्याला परिचित होते.

दरम्यान दिलिपराव याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले, तीन मुली, भावजयी, पुतणे असा मोठा परिवार असून भारतीय सैनिक दलातील बाळासाहेब मुन्तोडे यांचे ते मोठे बंधू होते.

दिलीप मुन्तोडे हा नगर जिल्हयातील रिपब्लिकन पक्षाचा कणा होता. एक आक्रमक व परखड स्वभावामुळे पक्षामध्ये त्याचा मोठा दबदबा होता. केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने ५ ते ६ महीन्यापुर्वीचं ना. आठवले यांनी त्यांच्या शिबलापूर येथिल घरी जावून भेट घेतली होती. दिलीप मुन्तोडे याच्या निधनामुळे रिपब्लिकन पक्षाची जिल्ह्यात मोठी हाणी झाली असून पक्ष एका चांगला व सच्चा कार्यकार्त्याला मुकला आहे.

विजयराव वाकचौरे, जेष्ठ नेते रिपाई
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !