संगमनेर Live | तालुक्यातील कुंभारवाडी येथे अंड्याचे पैसे न दिल्यामुळे एकाला शिविगाळ व मारहाण करण्यात आली असून तिघाविरुध्द आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बंडू दत्तु पावडे याने दिलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, १७ मे रोजी ७.३० वाजेच्या सुमारास कुंभारवाडी येथिल मारुती मंदिरासमोर शिवनाथ घाडगे याने अंड्याचे पैसे दिले नाही म्हणून मला शिविगाळ केली. यावेळी राजु घाडगे ही तेथे आला व त्याने ही शिवीगाळ करण्यास सुरवात केली. भांडणाचा आवाज ऐकून तेथे सुनिल घाडगे हा हातात काठी घेऊन आला व त्याने काहीही न बोलता माझ्या हाताच्या कोपरावर काठी मारली. त्यानतंर शिवनाथ व राजू घाडगे यानीही लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरवात केली, असे तक्रांरीत म्हटले आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात सुनिल राजू घाडगे, शिवनाथ बाबुराव घाडगे व राजु बाबुराव घाडगे (सर्व रा. कुंभारवाडी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध गुरंव नबंर ७२/२०२१ नुसार भादंवी कलम ३२३, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार शिदें हे करत आहेत.