आश्वी पंचक्रोशीला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा ; ३६ तास विजपुरवठा खंडीत.

संगमनेर Live
0

तान्हाजी नागरे या तरुणाने दाखलवलेल्या धाडसामुळे वीज पुरवठा सुरळीत.

संगमनेर Live | अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्याना तडाखा दिला असून या चक्रीवादळाचा फटका संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीला बसला आहे. 

दोन दिवसापासून जोरदार सोसाट्याचा वारा सुरु असल्याने जुनाट झालेली महावितरण कंपणीची यत्रंणा कोलमडल्यामुळे आश्वी बुद्रुक सह पंचक्रोशीतील गावानमध्ये ३६ ते २४ तासापर्यत वीज पुरवठा खंडीत झाला होता. आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्दला जोडणाऱ्या प्रवरा नदीच्या बंधाऱ्यावरील रस्त्यावर ११ के. व्ही. च्या वीज तारेवर झाड पडल्यामुळे तार पाण्याने काठोकाठ भरलेल्या नदीपात्रात पडली होती. 

ही तार काढण्यासाठी कोणीही धजावत नसल्याने आश्वी बुद्रुक येथिल ग्रामपंचायत सदस्य तान्हाजी नागरे या तरुणाने धाडस दाखवले. यावेळी उपसंरपच राहुल जऱ्हाड, महावितरणचे कर्मचारी काहळे, डेंगळे, जाधव, चौधरी, उंबरकर याच्या सहकाऱ्याने नदी पात्रातून वीज तार बाहेर काढली. त्यानतंर पंचक्रोशीतील गावाचा खंडीत वीज पुरवठा सुरळीत झाल्याने या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान मागील दोन दिवसात तोक्ते चक्रीवादळामुळे पंचक्रोशीतील गावानमध्ये लहान मोठी झाडे उनमळून पडली असून वीज प्रवाह खंडीत असल्याने नागरीकाना मोठा त्रास सहन करावा लागल्यामुळे महावितरणने मोडकळीस आलेली यत्रंसामुग्री बदलावी अशी मागणी नागरीकानमधून होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !