◻️ मंगळवारी ‘उत्सव माझ्या कुंकवाचा, वटसावित्री पौर्णिमेचा’ कार्यक्रमाचे आयोजन
◻️ सौ. शालिनीताई विखे, सौ. धनश्रीताई विखे आणि नीलमताई खताळ राहणार उपस्थित
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील स्वराज्य संकल्प भूमी मोरदरा येथील महाकाय वटवृक्षाच्या परिसरातील जाकमत बाबा मित्र मंडळ आणि महायुती महिला महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी ‘उत्सव माझ्या कुंकवाचा, वटसावित्री पौर्णिमेचा’ या कार्यक्रमाचे मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील पेमगिरी येथील मोरदरा परिसरात इतिहासकालीन महाकाय वटवृक्ष आहे. महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात महिलांचा वटसावित्री पौर्णिमा उत्सव साजरा व्हावा यासाठी जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्यावतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सौ. धनश्रीताई विखे पाटील आणि नीलमताई खताळ पाटील या उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील महिलांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.