घरकुलाच्यां कामांसाठी वाळू तात्काळ उपलब्ध करुन द्या - विकास गायकवाड

संगमनेर Live
0
घरकुलाच्यां कामांसाठी वाळू तात्काळ उपलब्ध करुन द्या - विकास गायकवाड 

◻️ तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी 

संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यात सुरू असलेली घरकुलांची कामे वाळू अभावी बंद आहेत. त्यामुळे या घरकुलासाठी तात्काळ वाळू उपलब्ध करुन द्यावी. यासाठी संगमनेरचे तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे आश्‍वी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर पंचायत समितीसह तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये सरकारच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, या घरकुल कामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे बहुतांश कामे बंद पडली आहेत. त्यामुळे ही कामे रखडली असून अपुऱ्या कामामुळे लाभार्थ्याना पैसे मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच वाळू अभावी घरकुलाची कामे वेळेत पुर्ण होण्याची शक्यता कमी आहे. 

त्याचबरोबर सरकारने घरकुलासाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यावरही आपल्या स्तरावर तात्काळ योग्य ती कारवाई करुन लाभार्थ्याना वाळू उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी विकास गायकवाड यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !