नेत्रदानाची चळवळ घराघरात पोहचवावी - गोरक्ष गाडीलकर

संगमनेर Live
0
नेत्रदानाची चळवळ घराघरात पोहचवावी - गोरक्ष गाडीलकर

◻️ श्री साईबाबा संस्‍थान येथे जागतीक नेत्रदान दिनानिमित्त विविध उपक्रम

◻️ नेत्रदात्‍यांच्‍या परिवारासह नेत्ररोपन झालेल्‍या रुग्‍णांचा केला गौरव

संगमनेर LIVE (शिर्डी) | संपुर्ण जगभरात १० जुन जागतीक नेत्रदान दिन म्‍हणुन साजरा केला जातो. जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्‍य साधुन श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ  रुग्‍णालयात दि. १० जुन २०२५  रोजी विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर होते. यावेळी श्री साईनाथ नेत्रपेढीमध्‍ये  नेत्रदान केलेल्‍या आठ नेत्रदात्‍यांच्‍या परिवारांचा सन्‍मान सोहळा तसेच याचबरोबर नेत्ररोपन झालेल्‍या ११ रुग्‍णांचाही यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात आला.

याप्रसंगी बोलताना गाडीलकर यांनी नेत्रदानाची चळवळ ही आणखी जोमाने पुढे नेवुन ही चळवळ घराघरात पोहचवावी असे आवाहन केले. नेत्रदात्‍यांच्‍या परिवाराच्‍या सत्‍कारा वेळी  मल्‍हारवाडी येथील नेत्रदाते कु. साहिल प्रशांत दोशी (वय - १२) आणि कु. दिव्‍या प्रशांत दोशी (वय - १५) या नेत्रदात्‍याच्‍या परिवारांचा आजी, आजोबा, वडील, बहीण मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे हस्‍ते सत्‍कार करण्यात आला.

याचबरोबर नेत्ररोपन झालेल्‍या रुग्‍णांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त करताना साईबाबा संस्‍थानचे आभार व्‍यक्‍त केले. डॉ. अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्‍व, नेत्रदाना विषयीची माहिती यावेळी उपस्‍थितांना दिली.  

यावेळी वैद्यकीय संचालक आणि लेफ्ट कर्नल डॉ. शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. अजित पाटील, डॉ. सौदामिनी निघुते, डॉ. अनघा विखे, सौ. मंदा थोरात, श्रीमती नजमा सय्यद आदि उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक वैद्यकीय अधिक्षीका डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले. तर, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुग्‍णालयाचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !