चारशे कलाकारांच्या ढोल ताशांच्या गजरात महावादनाने संगमनेर दुमदुमले

संगमनेर Live
0
चारशे कलाकारांच्या ढोल ताशांच्या गजरात महावादनाने संगमनेर दुमदुमले

◻️ आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक देशात वाढवा - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील राजकीय सुसंस्कृतपणा, आदर्शवत सहकार, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास यामधील काम याचबरोबर सांस्कृतिक विविधता ही जपण्याचे काम तरुणांचे असून आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक संपूर्ण देशामध्ये वाढवा. असे आवाहन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर बस स्थानक येथे ‘आय लव संगमनेर’च्या वतीने पारंपारिक वादकांचा महामेळावा व भव्य महावादन संपन्न झाले. यामध्ये तांडव, रुद्र, एकलव्य,  छावा, हिंदू राजा, या ढोल पथकातील ४०० कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आयोजक आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, गिरीश मालपाणी, दिलीपराव पुंड, डॉ. मैथिलीताई तांबे, नितीन अभंग यांच्यासह आय लव संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश उत्सवानिमित्त संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये आय लव संगमनेरच्या वतीने भव्य विद्युत रोषणाई मध्ये हा महामेळा संपन्न झाला. यावेळी पारंपारिक ढोल ताशांचा देशभर गजर करणारे ४०० युवक व युवतींनी व इतर दोनशे कलाकारांनी सहभाग घेतला. मराठी व हिंदी गीतांच्या विविध चालींवर ढोल ताशांच्या गरजेने संगमनेर शहर दुमदुमले. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, मराठी वाद्य आणि धार्मिक वातावरण याचबरोबर गणेशाचा जय जय कार यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला विकासाची मोठी परंपरा आहे. सर्व धर्म समभाव, बंधुभाव असलेले हे आदर्श व सुंदर शांततामय वातावरण असलेले शहर आहे. हा लौकिक आपल्या सर्वाना जपायचं आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संगमनेरचे मोठे नाव असून आय लव संगमनेर चळवळीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठे व्यासपीठ आमदार सत्यजित तांबे यांनी उपलब्ध करून दिले आहे. तरुणांचा मोठा सहभाग आणि धार्मिक वातावरण हा प्रसन्न सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. ही एकरूपता आणि संघटन चांगले असून त्याचा वापर तालुक्याच्या आणि देशासाठी व्हावी. संगमनेर शहराचा व तालुक्याचा आदर्श तालुका म्हणून तरुणांनी यापुढील काळातही देशभरात लौकिक वाढवावा असे आवाहन करताना सर्वानी शांततेने व मोठ्या भक्ती भावाने आनंदाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले कि, संगमनेरचे गुणी कलावंत देशभरामध्ये विविध ठिकाणी आपली कला साजरी करतात. ढोल ताशा पथकातील या सर्व कलाकारांना एकत्र घेऊन आजचा हा महावादन सोहळा होत आहे. पारंपारिक वाद्यांचा हा सोहळा संस्मरणीय असून यामध्ये युवक व युवतींचा मोठा सहभाग आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सर्वाचे सन साजरी करतात एकरूपता ही संगमनेर तालुक्याचे वैशिष्ट्य असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेरची एक समृद्ध परंपरा आहे. सांस्कृतिक वैभव लागलेल्या संगमनेरच्या या भूमीने देशाला दिशा दिली असून गणेश उत्सवाचा आनंद घेताना सर्वानी बंधुभाव अधिक वाढीस लावावा असे आवाहन त्यांनी केले.

संगमनेरमध्ये देशात नावाजलेले ढोल ताशा पथक आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी अशा विविध राज्यांमध्ये ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून वादन करत असतात. या सर्वाना एकत्र करून हा भव्य महावादन मेळावा होत आहे. हे सर्व संगमनेरकर एकरूप होऊन आज गणेश उत्सवानिमित्त गणेशाला महावंदन करत आहे. संगमनेरकर विविध जाती धर्माचे सर्व लोक एकत्र येऊन सर्वाचे सण आनंदाने साजरा करतात हे तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. आपल्या मातीतील कलाकारांचा गौरव होऊन संगमनेरचा गौरव देशात पोहोचवणारा हा महावादन सोहळा संस्मरणीय ठरणारा झाला असल्याचे आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !