महंत रामगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने लोणी खुर्द सप्ताहाची सांगता!​​

संगमनेर Live
0
महंत रामगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने लोणी खुर्द सप्ताहाची सांगता!
​◻️ हजारो भाविकांनी घेतला काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ


संगमनेर LIVE (​लोणी) | राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या ५४ व्या सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या सांगता सोहळ्यासाठी लोणी खुर्दसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावून कीर्तनसेवा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

​सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज यांनी आपल्या रसाळ व प्रबोधनपर कीर्तनातून समाजप्रबोधन केले. “मानवी जीवनात भक्ती, सदाचार आणि अध्यात्म या मूल्यांचा अंगीकार केल्यास समाजात शांती व एकोपा नांदतो,” असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर विठूनामाच्या आणि हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

​सन १९७२ मध्ये सरला बेटाचे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा लोणी खुर्द येथे सप्ताह पार पडला होता. स्व. आमदार चंद्रभानदादा घोगरे यांनी प. पू. नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली गावात अखंड हरिनाम सप्ताहाची ही मंगल परंपरा सुरू केली. ग्रामस्थांची अढळ श्रध्दा आणि एकोप्याच्या बळावर गेल्या ५४ वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू असून, सरला बेट आणि लोणी खुर्द ग्रामस्थांचे आध्यात्मिक नाते आजही तितकेच घट्ट आहे.

​सरपंच जनार्दन घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सप्ताहाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहकार्य केले.
​“गेल्या ५४ वर्षांपासून अविरत सुरू असलेली ही सप्ताह परंपरा म्हणजे लोणी खुर्दच्या सामाजिक एकोप्याचे आणि श्रध्देचे मूर्तिमंत प्रतीक आहे. गावातील तरुण, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व घटकांनी एकत्र येऊन दिलेल्या योगदानामुळेच हा सोहळा भक्तिमय वातावरणात निर्विघ्नपणे पार पडला. हा समृध्द वारसा पुढच्या पिढ्यांनीही असाच जपावा.” असे आवाहन सरपंच जनार्दन घोगरे यांनी केले
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !