सुवर्णकन्या प्रणिता सोमणची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत पदकांची ‘हॅटट्रिक’

संगमनेर Live
0
सुवर्णकन्या प्रणिता सोमणची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत पदकांची ‘हॅटट्रिक’

◻️ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून विशेष कौतुक


संगमनेर LIVE (लोणी) | सायकलपटू प्रणिता सोमण हिने ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एमटीबी सायकल स्पर्धेत वैयक्तिक तीन सुवर्णपदके पटकावून मिळविलेले यश अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविणारे असून, सायकलिंगसारख्या क्रीडा प्रकारात राज्याची नवी ओळख तिने निर्माण केली असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

ओडिशा राज्यातील महेंद्रगिरी येथे २३व्या राष्ट्रीय एमटीबी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला असून, यामध्ये प्रणिता सोमण हिचा समावेश होता. सदर स्पर्धेत प्रणिता सोमण हिने दर्जेदार कामगिरी करून वैयक्तिक तीन सुवर्णपदके, तसेच महाराष्ट्राच्या संघाला रौप्यपदक मिळवून दिले.

प्रणिता सोमण हिने मिळविलेल्या यशाबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन करून, सायकलिंगसारख्या एमटीबी क्रीडा स्पर्धेत अतिशय जिद्द आणि मेहनतीने मिळविलेल्या यशाचा निश्चित अभिमान वाटतो. यापूर्वी प्रणिताने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवून राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. राज्य सरकारच्या वतीने शिवछत्रपती पुरस्काराने तिचा सन्मान झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रणिता सोमण हिच्या सर्व यशस्वी वाटचालीत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला योगदान देता आले, याचा अभिमान वाटत आहे. लोणीमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रणिताच्या पालकांना सन्मानित करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !