जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘किसान सन्मान’चे १०८ कोटी वर्ग - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘किसान सन्मान’चे १०८ कोटी वर्ग - मंत्री विखे पाटील

◻️ अहिल्यानगर जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना लाभ

◻️ संगमनेर, नेवासा आणि पारनेर तालुक्याला सर्वाधिक निधीचे वाटप


संगमनेर LIVE (लोणी) | किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात १०८ कोटी ९५ लाख २४ हजार रुपये वर्ग झाले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असून, योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा २४ वा हप्ता आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही योजना ऐतिहासिक ठरली असून, वर्षाला ६ हजार रुपये थेट बँक खात्यात वर्ग होत असल्याने या योजनेचा मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे १०८ कोटी ९५ लाख २४ हजार रुपये जमा झाले असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, सद्यःस्थितीत पेरणीची कामे सुरू असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरते. यापूर्वी २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अनेक योजनांपैकी किसान सन्मान योजना ही महत्त्वपूर्ण ठरली असून, केंद्र सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना अखंडितपणे सुरू आहेत. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र सरकारकडून सातत्य राखले आहे.

अकोले तालुक्यातील ३४ हजार ५०८ शेतकऱ्यांना ६ कोटी ९० लाख, जामखेड २९ हजार ९४६ शेतकऱ्यांना ५ कोटी ९८ लाख, कर्जत ४३ हजार ५३९ शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाख, कोपरगाव २७ हजार ०६५ शेतकऱ्यांना ५ कोटी ४१ लाख, अहिल्यानगर ३० हजार ५५७ शेतकऱ्यांना ६ कोटी १२ लाख, नेवासा ५३ हजार ५३१ शेतकऱ्यांना १० कोटी ७० लाख, पारनेर ५० हजार शेतकऱ्यांना १० कोटी, पाथर्डी ३९ हजार ८५३ शेतकऱ्यांना ७ कोटी ९७ लाख, 

राहाता २३ हजार ८७२ शेतकऱ्यांना ४ कोटी ७७ लाख, राहुरी ३८ हजार १९५ शेतकऱ्यांना ७ कोटी ६३ लाख, संगमनेर ५८ हजार ५७६ शेतकऱ्यांना ११ कोटी ७१ लाख, शेवगाव ४२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ८ कोटी ४७ लाख, श्रीगोंदा ५० हजार ४४७ शेतकऱ्यांना १० कोटी ८९ लाख, श्रीरामपूर २२ हजार २३९ शेतकऱ्यांना ४ कोटी ४४ लाख रुपये, अशा रकमा तालुकावार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !