“माणसांची 'जिरवाजिरवी' करण्यापेक्षा जमिनीत पाणी जिरविण्याला आमचे प्राधान्य!”

संगमनेर Live
0
“माणसांची 'जिरवाजिरवी' करण्यापेक्षा जमिनीत पाणी जिरविण्याला आमचे प्राधान्य!”

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ​देवकौठे येथे १ कोटी ६ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “येथून मागील काळात तालुक्यात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण झाले. मात्र, आपण माणसांची जिरवाजिरवी करण्याऐवजी जमिनीत पाणी जिरविण्याला प्राधान्य देत आहोत. त्यासाठी लवकरच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार असून, गावोगावी बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरण करून पाणीसाठा वाढविण्यावर भर दिला जाईल,” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

​संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ तसेच जगदंबामाता मंदिर सभामंडपासह सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार खताळ व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विरोधकांवर टीका करताना आमदार खताळ म्हणाले की, “जनतेने परिवर्तनाचा धाडसी निर्णय घेतल्यानंतरही काहीजण आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. जनतेच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता, तालुक्यात होत असलेल्या विकासकामांच्या माध्यमातूनच आपण विरोधकांना उत्तर देऊ.” आपण कशा पध्दतीने काम करतो यापेक्षा केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो, हे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे देवकौठे परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. सध्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने गावातील बंधारे पुन्हा भरतील, ज्यामुळे शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीप्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही,” अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली. दरम्यान, दुष्काळामुळे आपण सत्कार स्वीकारणे बंद केले असले, तरी ज्येष्ठ नागरिकांचा मान राखण्यासाठी त्यांचा सत्कार स्वीकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी छबुराव सांगळे, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, एकनाथ मुंगसे, प्रताप मुंगसे, डॉ. सुभाष मुंगसे, डॉ. संतोष डांगे, मयूर दिघे, दत्तात्रय दिघे, अमोल आंधळे, बाळासाहेब मुंगसे, सुनील मुंगसे, अशोक कहांडळ, अजित शेवकर, संजय आरोटे, शिवाजी कहांडळ, सागर गाजरे, सचिन शेवकर, यश मुंगसे, अनिल मुंगसे, मच्छिंद्र गुडघे, अजित मुंगसे, बाळासाहेब मुंगसे, अभिमन्यू मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, भाऊसाहेब कहांडळ, संपत मुंगसे, तुषार मुंगसे, शशिकांत मुंगसे, प्रितम कहांडळ, समाधान कहांडळ, सुदाम कुरकुटे, संतोष कहांडळ, आकाश मुंगसे, अनिकेत मुंगसे, किशोर शेवकर, 

दादा कहांडळ, आदित्य आरोटे, निलेश कासार, जनार्दन सोनवणे यांच्यासह सुभाष शेवकर, संतोष आरोटे , बाबासाहेब कहांडळ, विजू मोकळ, सुभाष मुंगसे, शेवकर गुरुजी, दीपक शेवकर, किशोर शेवकर, राहुल मुंगसे, विशाल कासार, अंकुश कहांडळ, शुभम गाजरे, सार्थक कहांडळ, वैभव कहांडळ, विवेक मुंगसे, हरी ढोणे, संकेत राठी, कैलास गोर्डे, सुरेश दळवी, बाबासाहेब गोर्डे, रावसाहेब गडाख, किशोर गडाख ,सागर चत्तर, समाधान चत्तर, सुधीर घुगे यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिवसेना शाखाप्रमुख सुनील मुंगसे यांनी केले. सूत्रसंचालन अभियंता गणेश कहांडळ यांनी, तर आभार अभिमन्यू मुंगसे यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत. काही जणांकडून कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज किंवा गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र, अशा गोष्टींना बळी न पडता गावाच्या विकासासाठी मतभेद विसरून एकजुटीने काम करावे. नागरिकांच्या अडचणी शाखाध्यक्षांनी तात्काळ सोडवाव्यात; न सुटल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा.” असे आवाहन आमदार अमोल खताळ केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !