औषधनिर्माणशास्त्रातील ज्ञानाचा उपयोग मानवकल्याणासाठी करा - डॉ. सुस्मिता विखे

संगमनेर Live
0
औषधनिर्माणशास्त्रातील ज्ञानाचा उपयोग मानवकल्याणासाठी करा - डॉ. सुस्मिता विखे 

◻️​ प्रवरा महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न


'​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ’औषधनिर्माणशास्त्राचे शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे माध्यम नसून समाजाच्या आरोग्याची सेवा करण्याचे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाज व मानवकल्याणासाठी करून एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष औषधनिर्माणशास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण करावी,” असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले.

​लोणी येथील प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या परिसरात प्रथम वर्षातील नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतानाच, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव कटिबध्द असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी उपस्थित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्रातील भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन केले. औषधनिर्मिती उद्योग, संशोधन व विकास, रुग्णसेवा, उच्च शिक्षण आणि उद्योजकता या क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता व्यावहारिक ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि व्यावसायिक नैतिकता आत्मसात करण्याचा मोलाचा सल्लाही विद्यार्थ्यांना देण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ प्राप्त झाल्यानिमित्त डॉ. सुस्मिता विखे पाटील यांचा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि पायरेन्स परिसराच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, ​या सोहळ्याला संस्थेचे प्रमुख पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, बी. फार्म, डी. फार्म, एम. फार्म व फार्म. डी. अभ्यासक्रमाचे नवागत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !