◻ गुरुवारी भर दुपारी घडली घटना ; शहरातले लोन ग्रामिण भागात दाखल.
संगमनेर Live | भर दिवसा शहरात चेन स्केचिगं व रस्ता लुटीच्या घटना वारंवार घडत असताना त्याचे लोन ग्रामिण भागात ही पसरल्याचे पाहवयास मिळत असून संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल कारभारी मुरलीधर गिते याना गुरुवारी एका भामट्याने असेचं भर दिवसा अधिकारी असल्याचे भासवून त्याचा १ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल लुटल्याचे उघड झाल्याने आश्वी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेडगाव येथिल कारभारी मुरलीधर गिते हे गुरवार (दि. १७) रोजी आपल्या दुचाकीवरुन (एम. एच. १७ बी. आर. ३१३५) पिप्रीं-लौकी येथे राशन भरण्यासाठी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास चालले होते. यावेळी शिबलापूर गावापासून काही अतंरावर मागून एका पाढऱ्या रंगाच्या अँक्टीवा दुचाकीवरुन मध्यम बांधा, आंगात पाढंरा शर्ट व राखाडी रंगाची पँट घातलेला इसम आला व मला थांबवून शिदें याचा पत्ता विचारला. मी त्याला पाठीमागे चौकशी करा असे सांगितले असता त्याने मला तो अधिकारी असल्याचे सांगून मला विश्वासात घेतले व धोक्याचे दिवस असल्याचे सांगितले. त्यामुळे मला त्याने गळ्यातील चैन व बोटातील अगंठी रुमालात बांधून पिशवीत ठेवण्यास सागितले. मी सर्व वस्तू पिशवीत ठेवत असताना त्याने बळजबरीने चैन व अंगठी घेऊन त्यांच्या खिशात टाकली. त्यामुळे आमची झटापट झाली व तो गाडीवरून खाली पडला. त्यामुळे त्याने उठून मला लाथ मारली त्यामुळे मी बाजूला फेकलो गेलो. याचा फायदा घेत तो भामटा त्याच्या दुचाकीवरुन शिबलापूरच्या दिशेने निघुन गेला.
दरम्यान यावेळी माझा पुतण्या भारत किसन गिते हा तेथे आला असता मी त्याला संपूर्ण हकीगत सांगितल्यामुळे त्याने त्या भामट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे माझी ७० हजार रुपये किमंतीची दोन तोळे सोन्याची चैन व ३५ हजार रुपये किमंतीची एक तोळे सोन्याची अंगठी असा १ लाख ५ हजार रुपयेचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे सांगत आश्वी पोलीस ठाण्यात गुरंव नं २०२० प्रमाणे भादंवी कलम ३९४, १७० व ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील करत आहे.