◻ एनडीएचे सरकार सत्तेत येऊ न देण्याचे केले सुतोवाचन.
संगमनेर Live (पुणे) | देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाबरोबर केली होती. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात असा प्रयत्न परत करू. जे महाराष्ट्रात घडले नाही ते बिहारमध्ये घडवून आणू. बिहारमध्ये निवडणूक लढविण्याचा एकमेव उद्देश हा आहे की, एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय व आदिवासी मिळून ४० टक्के समाज आहे. त्यामुळे या सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे मौलवी, मौलाना तसेच सुशिक्षित मुस्लिम बांधवांना माझे सांगणे आहे कि याबाबत विचार करा, आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पाडू. असेही अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.