◻ आश्वी खुर्द विद्यानिकेतन उभारणीत सिहांचा वाटा ; सो. का. मुसमाडे नावाने होते परिसरात परिचित.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनचे सेवानिवृत्त प्राचार्य सोन्याबापू कारभारी उर्फ एस. के. मुसमाडे (वय - ७८) याचे आज दि. १६ रोजी (शुक्रवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. ते मुळचे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल रहिवासी असले तरी कर्मभूमी म्हणून आश्वी खुर्द येथे स्थायिक झाले होते.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आश्वी खुर्द येथे १९७४ साली आपली पहिली शाखा स्थापन केली. त्यावेळी येथिल पहिले प्राचार्य म्हणून दिवगंत मा. खासदार पद्मभुषन डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी एस. के. मुसमाडे यांच्यावर प्राचार्य पदाची जबाबदारी सोपवली होती. एस. के. मुसमाडे यांनी प्राचार्य व शिक्षक अशी दुहेरी भुमिका यशंस्वी पणे साभाळत आश्वी खुर्द येथिल विद्यानिकेतनचा पाया रचला. विद्यानिकेतनच्या जडणघडणीत त्याचा सिहांंचा वाटा होता. उत्तम प्रशासक व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यान बरोबर शिक्षक व पालकानमध्ये ते लोकप्रिय होते.
दिवगंत प्राचार्य एस. के. मुसमाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई व नातंवडे असा मोठा परिवार असून शिक्षक जगदिश मुसमाडे व अमोल मुसमाडे यांचे वडील तर पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाण्याचे मा. व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक रामभाऊ भुसाळ यांचे ते मेव्हणे होते.
दरम्यान दिवगंत एस. के. मुसमाडे यांचा अत्यविधी आज दुपारी शासकीय नियमाचे पालन करुन आश्वी खुर्द येथिल प्रवरातिरी होणार असल्याची माहिती निकटवर्तीयानी दिली असून उत्तम प्रशासक, शिस्तप्रिय शिक्षक व कौटुंबिक स्नेही गमावल्याची प्रतिक्रिया जेष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदंस्य आण्णासाहेब भोसले यांनी दिली आहे.