◻ आश्वी परिसरातील गावात पुन्हा आज बाधीत रुग्ण आढळले.
संगमने Live | गुरुवारी (२२ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात २७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक या गावामध्ये आज पुन्हा ३ नव्याने बाधीत रुग्ण आढळले आहेत.
गुरुवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ३, संगमनेर खुर्द येथे २, आश्वी बुद्रुक येथे ३, धांदरफळ बुद्रुक येथे १, चिखली येथे २, जोर्वे येथे १, समनापूर येथे ४, घुलेवाडी येथे २, बोटा येथे ५, राजापूर येथे १, निमोण येथे १, निमगाव टेभीं येथे १, रहाणे मळा, गुंजाळवाडी येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात २७ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक या गावामध्ये आज पुन्हा नव्याने ३ बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.