निळंवडे उजव्या कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू.

संगमनेर Live
0
मालुंजे येथील घटना ; कालवा सुरु होण्याआधी किती जणाचे जाणार बळी.? 

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे ४ वर्षीय बालकाचा अपूर्ण अवस्थेत असलेल्या निळवंडे कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थं आक्रमक झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालुंजे शिवारात निळवंडे कालव्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे खोदलेले खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहेत. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मालुंजे येथील घुगे वस्तीवरील युवराज बबन घुगे (वय - ४) हा चिमुकला खेळता - खेळता वस्ती लगत असलेल्या निळवंडे कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडला व पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे अर्धवट काम झालेल्या निळवंडेच्या खड्याने बबन घुगे याच्या एकुलत्या एका मुलाचा बळी घेतला असून अनेक वर्षापासून निळवंडे कालव्यासाठी ठिक - ठिकाणी खड्डे खोदून काम अपूर्ण अवस्थेत ठेवल्यामुळे नाहक बळी जात असल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त करुन ठेकेदार व प्रशासना विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दरम्यान तीन महिन्यापूर्वी २८ जून रोजी हिवरगाव पावसा शिवारात निळवंडे कालव्यासाठी खोदलेल्या खड्डयात अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पडल्यामुळे तिघाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. तर २० ऑक्टोबर रोजी मालुंजे शिवारात चिमुकल्याचा अशाचं एका खड्याने नाहक बळी घेल्यामुळे हे अपुर्ण कालवे आणखी किती बळी घेणार आहेत. असा जळजळीत प्रश्नं स्थानिक ग्रामस्थं विचारत आहेत.

निळवंडे कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून येथिल ४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून प्रशासन अथवा ठेकेदाराने साधे सात्वंन ही या कुटुंबाचे केलेले नाही. भविष्यात अशा दुर्देवी घटना घडू नये यासाठी सबधित ठेकेदाराने खड्याभोवती सुरक्षेच्या दृष्टिकोणातून जाळी बसवणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या संकटकाळात या गरीब कुटुंबाला ठेकेदार व प्रशासनाने अर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संदीप घुगे, 
प्रथम लोकनियुक्त सरपंच, मालुंजे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !