संगमनेर Live (बाबासाहेब वाकचौरे) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्षा अंतर्गत (दि. १९) रोजी ‘ इमुनीटी आणि कोविड - १९ ’ विषयावर विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायंस अँँण्ड हुमिनीटीस, अमरावती येथील डॉ. संगीता डोंगरे यांचे ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी डॉ. संगीता डोंगरे यानी सध्याच्या कोरोना महामारी व कोरोना विषाणू तसेच कोरोना आजाराची लक्षणे, कोरोना आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व कोरोना महामारी मध्ये आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल. याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या ऑनलाईन व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य घोलप डी. एन. यांनी केले व सूत्रसंचालन महिला सबलीकरण कक्षाच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पलघडमल यांनी केले. आभार प्रा. निलेश कान्हे यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवकांनी परिश्रम घेतले.