सगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल सचिन संजय जोशी (वय - २५) या तरुणाचा बुधवारी सायंकाळी प्रवरा नदी पात्रात तोल गेल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन जोशी हा तरुण बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रवरा नदी पुलावर बसलेला होता. यावेळी सचिनचा पुलावरुन तोल गेल्याने तो थेट नदी पात्रात पडला. परंतु बराचं वेळ होऊनही सचिन बाहेर न आल्यामुळे सचिनला शोधण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मालुंजे येथिल शंकर बुरुकुल, दाढ बुद्रुक येथिल सिध्दू मक्कावणे, किशोर मुळेकर, विकास शिदें आदिनी शर्थीचे प्रयत्नं केले. अखेर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सचिनचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
यावेळी घटनास्थळी पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर, पोलिस हवालदार विनोद गंभीरे, निलेश वर्पे, भाग्यवान, डोळस तसेच कामगार तलाठी मंगल फड व दाढ खुर्द येथील ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथिल प्रवरा रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी व एक मुलगी असा मोठा परिवार आहे. तर त्याच्या अकस्मित व दुर्देवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.