◻ आश्वी परिसरातील त्या गावात पुन्हा बाधीत रुग्ण आढळले.
संगमने Live | बुधवारी (२१ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात २० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरालातील रहिमपूर या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळले आहेत.
बुधवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ५, रहिमपूर येथे ३, सारोळे पठार येथे ३, गुंजाळवाडी येथे ५, धादंरफळ बुद्रुक येथे १, चिकणी येथे १, बोटा येथे १ व समनापूर येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात २० कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील रहिमपूर या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.