◻ आ. डॉ. तांबे यांच्या उपस्थितीत १८४ दिव्यांग व अपंगांना वैश्विक डिजिटल कार्डचे वाटप.
संगमनेर Live | समाजात असलेल्या दिव्यांग व अपंग व्यक्ती ह्या विशेष व्यक्ती आहेत. त्यांची सेवा केल्याने खर्या अर्थाने मानवतेची व परमेश्वराची सेवा होत असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले असून तालुक्यातील १८४ अपंगांना वैश्विक डिजिटल कार्डचे वितरण करण्यात आले.
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात संग्राम मतीमंद विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा मूकबधिर विद्यालय यांच्या वतीने आयोजित वैश्विक डिजिटल कार्डचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे होते. व्यासपीठावर इंद्रजित थोरात, जिल्हापरिषद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. नामदेव गुंजाळ, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, सूर्यकांत शिंदे, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, वाय. डी देशमुख, विनायक दाभोळकर, जालिंदर लहामगे, पांडूरंग कासार आदी उपस्थित होते.
आ. डॉ.तांबे म्हणाले की, समाजामध्ये दिव्यांग व अपंग व्यक्ती या विशेष व्यक्ती आहेत त्याच्यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. तसेच अपंग व्यक्तीसाठी त्वरीत निदान कक्ष पंचायत समितीत सुरू करण्यात यावा. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली अपंगांसाठी संगमनेर तालुक्यात राबवत असलेले वैश्विक कार्ड अभियान अपंगांसाठी राज्यभर राबविले गेले पाहिजेत. नव्या वैश्विक डिजिटल कार्डमुळे स्वतंत्र एसटी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, अपंग ओळख अशा वेगवेगळ्या कार्डची गरज भासणार नाही. अपंगांना इतरांनी सातत्याने मदत करून मानवतेचे दर्शन घडले पाहिजे तीच खरी परमेश्वर सेवा करणार असल्याचे ते म्हणाले.
नवनाथ अरगडे म्हणाले की, पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने संग्राम मतिमंद विद्यालयाच्या वतीने होणार्या उपक्रमांना साथ दिली जात आहे. तालुक्यातील सर्व अपंगांसाठी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू असेही ते म्हणाले. यावेळी आनंद आल्ले, सुरेश माळस, संजय मासाळ, प्रमोद राऊत, साहेबराव गुंजाळ, सुदाम राऊत आदि उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव खेमनर यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील कवडे यांनी केले व भाऊसाहेब नरवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.