◻ तालुक्याला मोठा दिलासा तर आश्वी परिसरातील गावान मध्ये पुन्हा बांधीत रुग्ण.
संगमनेर Live | शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्याला दिलासा मिळाला असून अवघे २३ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहेत. आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक व खळी या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळले आहेत.
शुक्रवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ६, आश्वी बुद्रुक येथे १, खळी येथे १, अंबोरे येथे १, जोर्वे येथे १, सारोळे पठार येथे ६, कोल्हेवाडी येथे १, तळेगाव दिघे येथे १, कोल्हेवाडी रोड येथे १, ढोलेवाडी येथे १, घुलेवाडी येथे १, कोकणगाव येथे १ व राजापूर येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात २३ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक व खळी या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.