नवरात्रो उत्संवाच्या पहिल्याचं दिवशी तालुक्यात पुन्हा कोरोना बांधीताची संख्या वाढली.

संगमनेर Live
0
◻ संगमनेर तालुक्यात तब्बल ३६ बांधीत रुग्णाची भर तर आश्वी परिसरातील गावान मध्ये पुन्हा बांधीत रुग्ण.

संगमनेर Live | शुक्रवारी मिळालेल्या दिलाशानतंर शनिवारी (१७ ऑक्टोबर) रोजी म्हणजे नवरात्रो उत्संवाच्या पहिल्याचं दिवशी संगमनेर तालुक्यात ३६ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्याने उत्संव काळात नागरीकाना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तर आश्वी परिसरालातील शेडगाव या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळला आहे.

शनिवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ३, संगमनेर खुर्द येथे ४, शेडगाव येथे १, गोडसेवाडी येथे १, सारोळे पठार येथे २, राजापूर येथे ३, जोर्वे येथे २, कोकणगाव येथे ३, तळेगाव दिघे येथे ३, माळेगाव हवेली येथे ३, गुंजाळवाडी येथे २, पिपंरणे येथे १, पेमगिरी येथे १, साकूर येथे १, घुलेवाडी येथे ३, चिकणी येथे १, सारोळे पट्टा येथे १ व आनंदवाडी येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ३६ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.

दरम्यान आश्वी परिसरातील शेडगाव या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.

टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !